पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपूर येथील एका शेतकऱ्यांच्या शेतातून २० हजार रूपये किंमतीच्या ठिंबक नळ्या चोरल्याचे उघडकीला आहे. पारोळा पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शेख शब्बीर शेख मुसा (वय-४५) रा. बहादरपूर ता. पारोळा यांचे जिराळी शिवारात वडीलोपार्जीत शेत आहे. शेतात त्यांनी ठिबकच्या नळ्या ठेवलेल्या होत्या. २७ मे रोजी मध्यरात्री डिगंबर शिवाजी पाटील (वय-२२) रा. कंकराज ता. पारोळा, गोपाळ रामदास मराठे (वय-२६), हेमंत शिवाजी पाटील (वय-२१), सुनिल साहेबराव पाटील (वय-२२) रा. मुकटी ता. धुळे हे शेख शब्बीर यांच्या शेतात जावून २० हजार रूपये किंमतीच्या नळ्या चोरून नेत असतांना रंगेहात पकडले. चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नाना पवार करीत आहे.