जळगाव, प्रतिनिधी | राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे तोच फार्मुला जळगाव जिल्हा परिषदेत लागू करण्याचे संकेत कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत. जळगाव पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे नंदलाल शांताराम पाटील तर संगीता चिंचोरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी दोघांचे अभिनंद केले.
जळगावसह धरणगाव, एरोंडल, भडगाव, पारोळा या पाच पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे सभापती व उपसभापती निवडून आल्याची माहित देत आगामी काळात ही संख्या दहा पर्यंत नेण्याचा प्रयंत्न असेल असे ना. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या संदर्भात ना. गुलाबराव पाटील यांंना प्रश्न विचारला असता नाथाभाऊ यांचा तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न असे उत्तर देण्याचा प्रयत्न ना. पाटील यांनी केला. जेव्हा त्यांना नाथाभाऊ यांनी नावे घेतली असल्याचे सांगण्यात आले तेव्हा त्यांनी आम्ही देखील नावे घेतली ज्यात चंद्रशेखर अत्तरदे, बोरोलो, प्रभाकर गोटू सोनवणे, शिंदे यांनी बंडखोरी केली. मात्र त्यांना पार्टीतून काढण्यात आले नाही उलट बंडखोरांना पार्टी मांडीवर घेते यांना कुठून काढणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाग पहिला
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/565649897500756/
भाग दुसरा
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2573851642852333/
भाग तिसरा
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/748592345626819/