यावल (प्रतिनिधी) शहरातील पाच वर्षीय चिमुकली जेहरा फातेमा खान हिने रमजानचा पवित्र रोजा (उपवास) ठेवला होता. या धाडसाबद्दल जेहराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील बाबुजीपुरा परिसरात राहणारे नसरुउल्ला खान यांच्या पाच वर्षीय चिमुकली जेहरा फातेमा खान हिने रमजानचा पवित्र रोजा (उपवास) ठेवला होता. तिने दाखवलेल्या धाडसाचे कुंटुबासह समाजातील नागरीकांनी कौतुक करून तिला आशीर्वाद दिला आहे. जेहरा फातेमा ही यावल येथील नगरपालिका कर्मचारी असद खान यांची ती पुतणी आहे