जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील 21 लसीकरण केंद्रावर कोवीशील्डची पहिली आणि दुसरी लस देण्यास सुरूवात झाली आहे. आज जिल्हाभरात एकुण 947 जणांना पहिली लस तर 418 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 18 हजार 763 जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला दिसून आला आहे. आजच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोरोनाची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त करत नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आज जिल्ह्यातून 146 बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील 21 कोवीड लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. जिल्हा रूग्णालय- 105, गोल्ड सीटी हॉस्पिटल-105, गाजरे हॉस्पिटल-41, ऑर्किड हॉस्पिटल-35, जैन हॉस्पिटल-०, जामनेर-26, चोपडा-20, मुक्ताईनगर-55, चाळीसगाव-47, पारोळा-14, भुसावळ-50, अमळनेर-52, पाचोरा-53, रावेर-99, यावल-19, भडगाव-2, बोदवड-16, एरंडोल-66, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-28, धरणगाव-108, एम.डी. भुसावळ-6 असे एकुण 947 जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज 418 जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.