१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्यात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे. संसदेच्या नवीन इमारतीत पहिल्यांदाच नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. यानंतर २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

२७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. या वेळी भाजपकडे एकहाती बहुमत नसल्यामुळे प्रोटेम स्पीकरवरून सरकार आणि विरोधकांतील तणाव समोर आला आहे. भाजप नेते आणि ७ वेळा खासदार भर्तृहरी महताब यांना हंगामी अध्यक्ष बनवल्यामुळे गदारोळ होण्याची शक्यता आहे.राष्ट्रपती मुर्मू सोमवारी महताब यांना शपथ देतील. नंतर महताब सकाळी ११ वा. कामकाज सुरू करतील. सुरेश यांना जातीवरून हंगामी अध्यक्षपदासाठी नाकारण्यात आल्याचा काँग्रेस नेत्यांनी केला आरोप

८ वेळा काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांच्या दाव्याकडे दुर्लक्ष केले. सुरेश दलित असल्याने त्यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले नाही, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. सात वेळा जिंकण्याचा निकष असेल तर कर्नाटकातील भाजप खासदार आर.सी. जिगाजिनागी आहेत. त्यांचा विचार का केला नाही? कारणे ते दलित आहे म्हणून? तत्पूर्वी किरेन रिजिजू म्हणाले, सुरेश आठव्यांदा खासदार झाले, परंतु १९९८ व २००४ मध्ये पराभूत झाले होते.

Protected Content