मुंबई । राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याची प्रक्रिया आणि जनगणना -२०११ चा पहिला टप्पा यावर्षी कोविड -१९ आजारामुळे पुढे ढकलण्यात आला आहे, ज्यास एक वर्ष उशीर होण्याची शक्यता आहे. देशभरात कोरोना इन्फेक्शन वाढत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पीटीआयने याबाबत सांगितले आहे.
भारतीय जनगणना जगातील सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकीय अभ्यासांपैकी एक आहे. या जणगणनेत ३० लाखांहून अधिक अधिकारी देशातील प्रत्येक गावांमध्ये घरोघरी जाऊन माहिती नोंदवतात. या प्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “जणगणनेची प्रक्रिया आता सुरु करणं तितकं महत्वाचं नाही. यामध्ये भलेही एक वर्षांचा विलंब झाला तरी त्यामुळे कुठलेही नुकसान होणार नाही.” या अधिकाऱ्यानं पुढे म्हटलं, “जनगणना २०२१चा पहिला टप्पा आणि एनपीआर अपडेशनबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, २०२० मध्ये करोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ही प्रक्रिया होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. जणगणनेमधील घरांच्या यादीचा टप्पा आणि एनपीआर अपडेशनची प्रक्रिया १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत संपूर्ण देशात लागू करण्यात येणार होती. मात्र, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळं याला स्थगिती देण्यात आली आहे.”