जळगाव, प्रतिनिधी | येथील गुजराती समाज महिला मंडळाचा पहिला पदग्रहण समारंभ सत्य वल्लभ सभागृहात उत्साहाच्या वातावरणात घेण्यात आला. या मंडळात प्रथम महिला अध्यक्ष होण्याचा मान भावना चौहाण यांना मिळाला आहे. उपाध्यक्षपदी पौर्णीमा देसाई तर सचिवपदी रंजन पटेल यांची देखील वर्णी लागली आहे.
जळगाव जिल्ह्यातील विविध गुजराती मंडळ एकत्र येऊन हे गुजराती समाज महिला मंडळ तयार करण्यात आले आहे. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून गुजराती समाजाचे अध्यक्ष राजेश दोशी, मनोहर पटेल, प्रिया नेमाडे, मुकेश चौहाण, सतीश लाड, नैलेश पारेख, रमण पटेल हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांस विविध रोपे देत वृक्षारोपणाचा संदेश देऊन स्वागत करण्यात आले. गुजराती महिला भगिनी यांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नूतन कक्कड यांनी केले. अनेक वर्षांपासून गुजराती समाज मंडळ हे कार्य करत असून, पुरुष मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत परंतु,विविध मंडळ एकत्र येत महिला भगिनींचा देखील एक गुजराती समाज महिला मंडळ असावं असं वाटत होतं आणि त्याला आज मूर्त स्वरूप मिळाल्याचे अध्यक्षीय भाषणातून राजेश जोशी यांनी सांगितले.
नवनियुक्त प्रथम कार्यकारिणीत यांचा समावेश…
अध्यक्ष भावना चौहाण, उपाध्यक्ष पौर्णीमा देसाई, सहा उपाध्यक्ष मनीषा संगवी, सचिव रंजन पटेल, सहसचिव वंदना भाटिया, खजिनदार यामिनी परमार, सहखजिनदार नीता परमार, कार्याध्यक्ष माया दोषी, सहकार्य अध्यक्ष जयश्री मेहता तर सदस्यांमध्ये कीर्ती चौहाण, बिंदिया जानी, जागृती मेहता, किरण वणरा, शीला पटेल, मनीषा सराफ, गीता शाह सल्लागार म्हणून, छाया भाटिया, नैना संघवी, सुमन पटेल, सुनिता कोठारी, स्मिता वेद, शकुंतला पटेल, नूतन कड यांचा समावेश आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने गुजराती समाज महिला पुरुष उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गुजराती समाज महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी कामकाज पहिले.