मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी संपली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांपर्यंत महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध केल्या जात होत्या.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा समोर आला आहे. महायुतीमध्ये सर्वात जास्त भाजपच्या १४८ जागा आहेत. शिवसेनेला ८५ तर अजित पवार गटाला ५१ जागा मिळाल्या आहे. उर्वरित ७ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहे.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपाने १६४ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी १०५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपने महायुती धर्माचे पालन करत १६ जागा कमी लढवल्या आहेत. शिंदे गटाने वाटाघाटी करत ८५ जागांपर्यंत मजल मारली आहे. अजित पवार गटाला ५१ जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.