जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परिवर्तन ही सतत सांस्कृतिक कार्य करणारी संस्था असून शहर सांस्कृतिक करण्याचे काम परिवर्तन करीत असल्याचे मत आ. राजूमामा भोळे यांनी मैत्र महोत्सवाचे समारोप करताना केले. नऊ दिवसांचा महोत्सव भाऊंच्या उद्यानात घेण्यात आला होता. याप्रसंगी रेखा महाजन यांनी कला ही शहराच आरोग्य उत्तम ठेवण्याचं काम करते, परिवर्तन कलेच्या माध्यमातून शहरातच आरोग्य सुंदर करण्याचे काम करत आहे, हे मला महत्त्वाचे वाटत असे मत व्यक्त केले. नऊ दिवसांचा महोत्सव भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन व परिवर्तन जळगाव यांच्या वतीने भाऊंच्या उद्यानात मैत्र महोत्सवाचा समारोप करण्यात आला. भवरलाल भाऊ जैन व कविवर्य ना. धों. महानोर यांच्या मैत्रीला समर्पित असा हा महोत्सव होता.
समारोप प्रसंगी आ. राजू मामा भोळे, उद्योजक नितीन इंगळे, प्रीती अग्रवाल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सोबत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रम सुरू करण्यात आला. महोत्सव प्रमुख स्वरूप लुंकड, डॉ. रेखा महाजन, मानसी गगडाणी, विनोद पाटील, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे उपस्थीत होते, महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विनोद अजनाडकर, मंगेश कुलकर्णी नेहा पवार, प्रवीण पाटील, अनिल चौधरी, अक्षय नेहे, विकास वाघ, प्रा मनोज पाटील, जय सोनार, योगिता भालेराव, गणेश सोनार, अभिजीत पाटील आदींनी परिश्रम घेतले.