भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचे सुरु असलेले आमरण उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आज (दि.१५) मागे घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी उपोषणाला बसलेल्या कामगाराना शरबत पाजल्यावर उपोषणाची सांगता झाली.
औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना नियमित २६ दिवस काम मिळण्यासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी राष्ट्रीय मजदूर सेनेच्या नेतृत्वात दीपनगर येथील गेट क्रमांक- १ समोर आमरण उपोषण सुरु केले होते . पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी कामगारांना सोबत घेऊन मुख्य अभियंता यांच्याशी चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांशी सकारात्मक बोलणी झाल्यावर आमरण उपोषण मागे घेण्यात आले. मात्र कामगारांच्या मागण्या पुर्ण न केल्यास तीव्र आदोलन करण्याचा इशारा जगन सोनवणे यांनी दिला आहे.