Home क्राईम राहिलेले पैसे मागितल्यावरून शेतकऱ्याला अश्लिल शिवीगाळ

राहिलेले पैसे मागितल्यावरून शेतकऱ्याला अश्लिल शिवीगाळ


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील इंदीरा कन्या शाळेजवळ राहणाऱ्यास एका तरूणाला उरलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर जखमी केले तलवारीने खून करण्याची धमकी दिल्याची घटना गुरूवारी २३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष जयसिंग मोरे रा. दुसखेडा ता.धरणगाव हे आपल्या परिवारातस वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी त्यांचा मालकिचा बैल हा धरणगाव येथील स्वप्निल उर्फ सोनू पांडूरंग धनगर याला विकला होता. त्यांची काही पैसे धनगर यांच्याकडे बाकी होते. दरम्यान शेतकरी संतोष मोरे यांनी गुरूवारी २३ जानेवारी रोजी धरणगाव येथील इंदीरा कन्या शाळेजवळ येवून स्वप्निल धनगर याला पैशांची मागणी केली. याचा राग आल्याने स्वप्निल धनगर याने अश्लिल शिवीगाळ करत तलवारीने तुमचा खून करून टाकीन अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर शेतरी संतोष मोरे यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या स्वप्निल उर्फ सोनू पांडूरंग धनगर रा.धरणगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound