नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात कांद्याच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे आज मतदान करताना ही मतदार राजाने गळयात कांद्याची माळ घालत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. बागलाणचे माजी आमदार दिपीक चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील यात सहभाग घेत आज मतदान केले आहे. तर यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाणाऱ्या काही शेतकरी तरुणांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.
यंदाच्या निवडणुकीत कांदा प्रश्न चांगलाच गाजल्यानं शेतकऱ्यांनी मतदानाच्या दिवशी हि सरकारला कांदा प्रश्नांची आठवण करून दिली. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याचा निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणांना मतदान केंद्राच्या गेटवरवरच पोलिसांनी अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. दरम्यान, पोलिसांबरोबर त्याची शाब्दिक चकमक देखील झाली. मात्र, पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना शांत केल आणि अखेर त्यांनी गळ्यातील माळा काढून ठेवत मतदान केले.