दिव्यांग वृध्दाची शेतजमीन खोटे नोंदी घेवून फसवणूक करत मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विठ्ठल पेठ परिसरात राहणाऱ्या दिव्यांग वृध्दाच्या नावे असलेली जमीन महसुल अधिकारी यांना हाताशी घेवून खोट्या नोंदी घेवून नावावर करून घेत फसवणूक केली. याबाबत त्यांनी हरकत घेतली असतांना त्यांना शिवीगाळ मारहाण करून दुखापत केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश सोमा खडके वय ६२ रा. विठ्ठल पेठ, जळगाव हे वृध्दव आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शिवारातील शेत गट क्रमांक ११४ ब मध्ये शेत आहे. ही जागा त्यांच्या नावे आहेत. दरम्यान धर्मा बोंदू खडके वय ७२, भरत धर्मा खडके वय ५५ आणि विजय धर्मा खडके वय ५० तिघे रा. रामपेठ, जळगाव यांनी ३० जून २०१५ ते ४ डिसेंबर २०२४ दरम्यानच्या कालावधीत संगनमत करून कट कारस्थान करत महसुल अधिकारी यांना हाताशी घेवून खोट्या नोंदी घेवून राजेश खडके यांच्या नावावरील १८ आर क्षेत्र हे ७/१२ उताराव्यावर नावे लावून घेतले. याची माहिती मिळाल्यानंतर राजेश खडके यांनी माहितीचा अधिकारामार्फत माहिती मागितली असता त्यांना माहिती मिळाली नाही.

तसेच त्यांच्या नावावरील जागीवर तिघांनी अतिक्रमण करून बांधकाम करण्याचे करत असतांना राजेश यांनी हरकत घेतली. या रागातून धर्मा खडके, भरत खडके आणि विजय खडके या तिघांनी राजेश खडके यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी त्‍यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार धर्मा बोंदू खडके वय ७२, भरत धर्मा खडके वय ५५ आणि विजय धर्मा खडके वय ५० तिघे रा. रामपेठ, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद

Protected Content