जामनेर (प्रतिनिधी) ग्रामीण महाराष्ट्रात दस्त नोंदणीसाठी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वर रुमसाठी स्पेशल एसी रूमची आवश्यकता असते. ती सुविधाच राज्याच्या मुंबई वगळता इतर भागात उपलब्ध नसल्यामुळे उष्णतेने सर्वरमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
मुंबई मध्ये मात्र सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वरसाठी एसी रूम आहे. ग्रामीण भागातील दुय्यम निबंधक कार्यालयात हा दुजाभाव होत असल्याने दस्त नोंदणी कामामध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. आँनलाईन सर्वर चालत नाही, आणि जनतेची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या बाबतीत मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून तक्रारी येत असून अजूनही शासन स्तरावरून याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न खितपत पडलेला आहे. याबाबत राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. हा प्रश्न गंभीर असून याकडे लक्ष देणे, गरजेचे झाले आहे.