जळगावात दोन अल्पवयीन मुलींच्या समलिंगी प्रेमविवाह नाट्याचा वेळीच पर्दाफाश (व्हिडीओ)

603833cd 1ef4 4ee5 8351 626164cc92a8

जळगाव (प्रतिनिधी) लहानपणापासून एकमेकांसोबत राहिलेल्या, खेळलेल्या दोन अल्पवयीन मुलींमध्ये प्रेम निर्माण होवून त्यांनी पळून जावून लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांचा हा बेत वेळीच कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने उघडकीस आला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांच्या मदतीने दोन्ही मुली व त्यांना सहकार्य करणारा एक तृतीयपंथी अशा तिघांना यावल तालुक्यातील पाडळसरे येथून ताब्यात घेतले आहे. आज सकाळपासूनच रामानंदनगर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलींचे हे प्रेम आणि पलायन नाट्य रंगले असून त्याचीच चर्चा सुरु आहे.

 

या प्रकाराबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, समता नगरातील दोन अल्पवयीन मुली शेजारी-शेजारी राहत असताना लहानपणापासून त्यांचे सोबत खेळणे, जेवणे, बाहेर फिरणे होत होते. एवढे सर्व होत असताना दोघांना एकमेकांबाबत आकर्षण वाढू लागले. या आकर्षणाच्या माध्यमातून त्यांचे एकमेकींवर प्रेम बसले. दोघींनी आता प्रेमाचे रुपांतर लग्नात करण्याचा विचार करून घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे गेल्या शनिवारी (दि.६ मे) रोजी दुपारच्या सुमारास दोघी घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर शहरातच थांबून दोघांपैकी एक मुलगी कपडे आणण्यासाठी परत घरी आली. कोणालाही शंका येणार नाही याची खबरदारी घेतली, कपडे घेऊन आल्यावर त्या दोघा अल्पवयीन मुलींना त्याच परिसरात राहणाऱ्या एका तृतीयपंथीयाने दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून यावल तालुक्यातील पाडळसे येथे नेले. शनिवारी रात्रभर तिघांनी एकीच्या नातेवाईकांकडे मुक्काम केला. त्यानंतर दुसरी मुलगीही आपले कपडे आणण्यासाठी पाडळसे येथून जळगावला परत आली. घरी आल्यानंतर तिनेही कपडे भरण्यास सुरुवात केली.

ती पिशवीत कपडे भरत आहे ? हे नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर दुसऱ्या मुलीच्या कुटुंबीयांनी दोन फटके मारून विचारणा केली असता सगळी हकीकत तिने आई वडिलांसमोर सांगितली. दुसऱ्या मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत या घटनेची माहिती दिली. रामानंदनगर पोलिसांनी तत्काळ पालकांना सोबत घेत सोमवारी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास पाडळसे गाठले. तेथून तृतीयपंथी व दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेवू रामानंदनगर पोलिस स्थानकात आणण्यात आले. दोन्ही अल्पवयीन मुलींमधली एक मुलगीही तृतीयपंथी असल्याचा संशय स्थानिक रहिवासी व पोलिसांना आला होता कारण तिची राहणे एखाद्या मुलासारखे होते, चालन्याची पद्धत, हातातील ब्रेसलेट घालणे, घोगरा आवाज, असे तिचे वागणे दिसत होते. तिच्या चालण्या-बोलण्यातून लक्षणावरून रामानंद नगर महिला पोलिसाने शारीरिक तपासणी केली असता ती अल्पवयीन मुलगी असल्याचे निदर्शनास आले.

रामानंद नगर पोलीस स्थानकात आज सकाळी ९.०० ते १०.०० वाजेच्या दरम्यान स्थानिक रहिवाशांनी व रिपाईचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी समता नगरात राहात असलेल्या तृतीयपंथीयांना यापुढे तिथे राहू देऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले आहे. दोन्ही अल्पवयीन मुली व त्यांच्या कुटुंबियांची समजूत घालण्याचा प्रयत्न रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

 

 

 

Add Comment

Protected Content