धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावातील चामुंडा माता मंदीराची दानपेटी फोडून १२ ते १३ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आले आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावात बडगुजर समाजाचे कुलदैवत चामुंडा मातेचे मंदीर आहे. मंगळवारी २३ जुलै रोजी रात्री ९ वाजता येथील मंदीराचे जेष्ठ मार्गदर्शक देवा महाराज यांनी मंदीर बंद करून कुलूप लावून निघून गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदीराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, त्यानंतर मंदीरातील दानपेटी फोडून जवळपासून १२ ते १३ हजारांची रोकडची चोरी केली. दुसऱ्या दिवशी बुधवारी २४ जुलै रोजी देवा महाराज हे सकाळी ७ वाजता मंदीरात पुजेसाठी गेले त्यावेळी मंदीरातील दानपेटी फोडल्याने समोर आले. त्यानेी गावातील समाजबांधवांना बोलावून माहिती दिली. त्यानुसार मंदीराचे ट्रस्टी यांनी गावातील पोलीस पाटील गोपाल बडगुजर यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी धरणगाव पोलीसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.