भडगाव प्रतिनिधी । येथिल ग्रामीण रुग्णालयात कार्यरत नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे हे दारुच्या नशेत तर्रर्र होऊन कॅबिनमध्ये झोपलेले अवस्थेत आढळुन आले आहे. यावेळी डोळे तपासणी व शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेले रुग्ण डॉक्टराची दारु केव्हा उतरेल ? या प्रतिक्षेत रुग्ण रुग्णालयात ताटकळत उभे असून या घटनेवर रुग्णाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत दारूच्या नशेत असलेल्या डॉक्टरची त्वरित बदली करण्याची मागणी केली.
नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे हे मागिल दोन महिन्यापुर्वी भडगाव ग्रामिण रुग्णालयात हजर झाले आहे. कार्यालयीन वेळेत नेहमीच दारुच्या नशेत असतात. हा अनुभव डोळे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना नेहमीच येत असतो. आज तर या बाबतीत कहरच झाला आहे. डॉ. संतोष. अहिरे हे १२ वाजेच्यासुमार दारुच्या नशेत तर्रर्र झालेले दिसुन आले. यावेळी दारुच्या नशेत आल्यानंतर त्याच्या कॅबिनमध्ये असलेल्या बेड झोपुन होते.
यावेळी ग्रामीण भागातुन डोळे तपासणीसाठी आलेले रुग्ण तसेच जळगाव येथे डोळ्याचा शस्त्रक्रिया शिबिर होते. डोळे तपासणी करुन डोळ्याचे शस्त्रक्रिया करण्यासाठी जळगाव येथे जाण्यासाठी तयारी सह १० ते १५ रुग्ण आले होते. ते जळगाव जाण्यासाठी डॉ.संतोष अहिरे यांची वाट पहात होते. मात्र डॉक्टरची परीस्थिती पाहुन आपले जळगाव जाणे होईल की, नाही या प्रतिक्षेत उभे होते. यावेळी रुग्णानी नेत्र चिकीत्सक डॉ.संतोष अहिरे यांना जागे करुन बोलत करण्याचा प्रयत्न केला असता त्याना साधे बोलता देखिल येत नव्हते.
यावेळी रुग्णानी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. साहेबराव अहिरे यांच्याकडे धाव घेत नेत्र चिकीत्सक डॉ.संतोष अहिरे यांची तक्रार करत आमची नेत्र तपासणी कोण करणार व शिबीरसाठी जळगाव येथे कोण नेणार याबाबत चौकशी करु लागले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. साहेबराव अहिरे यांनी नेत्र चिकीत्सक डॉ. संतोष अहिरे यांची कॅबिन गाठत परीस्थिती पाहुन डॉ. संतोष अहिरे यांची कान उघडणी करत सदरचा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला.
यावेळी शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथे जाण्यासाठी आलेले रमेश पाटील, केशव शिंपी भडगाव, अशोक पाटील, विमलबाई पाटील, रामकृष्ण पाटील खेडगाव, सुपडु गौंविद बाविस्कर निभोरा, कौश्यलाबाई बापु पाटील लोणपिराचे यांच्यासह आदी रुग्ण हजर होते.
यानंतर डॉ. संतोष अहिरे यांच्या घरी संपर्क साधत त्याच्या मुलांच्या ताब्यात देऊन त्याची घरी रवानगी करण्यात आली. यापुर्वी कार्यरत असलेल्या ठिकाणी देखील त्याचे असेच वर्तन असल्याने त्याची बदली येथे करण्यात आल्याचे समजते.