जिल्ह्याला उद्या 1360 रेमडेसीवीरचे डोस मिळणार; माजी मंत्री खडसे यांच्या प्रयत्नाला यश

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असतांना रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा निर्माण झाला होता. याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे इंजेक्शनची मागणी केली होती. त्यानुसार उद्या जिल्ह्याला १ हजार ३६० रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरावठा केला जाणार आहे. 

हे इंजेक्शन उद्या १३ एप्रिल रोजी  सकाळी जिल्ह्यात दाखल  होणार आहे.  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आता जिल्ह्यासाठी दोन हजार  इंजेक्शनची मागणी मंत्री राजेद्र शिंदे यांच्याकडे केली होती, पंरतु सध्या देशांतील व राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जळगाव जिल्ह्यासाठी १ हजार ३६० रेमडीसिव्हर इंजेक्शन देण्याचे मंजूर केले आहे. अजून पुढील दोन ते तीन दिवसा इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती  अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी माजीमंत्री एकनाथराव खडसेंना दिली. 

गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून ही दुसरी लाट पहिल्या टप्प्यातील लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे. त्यामुळे महिनाभरातच सक्रिय रुग्णांची संख्या दहापटीने वाढून ती १० हजारांच्या वर पोचली आहे. यातील बहुतांश रुग्णांना कोरोनावर उपयुक्त ठरणारे रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज भासत असून त्याची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होऊन काळा बाजारही मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. 

 

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरल्याने यापुर्वी ४ हजार रेमडीसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा शासनाकडून झाला होता व आता परत १ हजार ३६० इंजेक्शन जिल्ह्याला मिळत आहे. ऑक्सीजन पुरवठ्याबाबतही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अन्न व औषध प्रशासन विभाचे मंत्री राजेंद्र शिंगणे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे केली होती व जिल्ह्यांतील ॲाक्सिजन पुरवठा ही करायची विनंती मंत्रीमहोदयांना केली होती त्यानुसार जिल्ह्यासाठी शासना कडून त्वरीत ॲाक्सिजन पुरवठा हि करण्यात आला होता

या स्थितीत इंजेक्शनअभावी अनेक रुग्णांना जीवही गमवावा लागत असून जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाल्याने माजी मंत्री खडसेंनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त व अधिकार्यांसह स्थानिक निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव यांच्याशी चर्चा करुन माहिती जाणून घेतली होती. जळगाव जिल्ह्यातील रूग्णांनसाठी वेळोवेळी आवश्यक ती मदत केल्याबद्दल एकनाथराव खडसेंनी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार व्यक्त केले आहे.

Protected Content