जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला नुकतीच सुरुवात झाली आहे.
आजच्या बैठकीत दिनांक 8 मार्च, 2019 रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2018-2019 माहे मार्च 2019 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेणे, (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम) जिल्हा वार्षिक योजना 2019-2020 चे नियोजन (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम) जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा परिषदेकडील अखर्चित निधीचा आढावा घेणे, अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषयांवर चर्चा आणि कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/509694643099670/