रेल्वे स्टेशन ते बस स्टँड पर्यंतचा मार्ग १८ मीटर व्हावा; आम आदमी पक्षाने दिला आंदोलनाचा इशारा

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगांव रेल्वे स्टेशन ते बस स्टँड पर्यंतचा मार्ग १८ मीटर व्हावा यासाठी आम आदमी पार्टी ने आंदोलनाचा इशारा दिला आहे. वरणगांवचा प्रमुख मार्ग रेल्वे स्टेशन ते रावजी बुवा पर्यंतचामार्ग मार्ग मोकळा व्हावा जेणेकरून वरणगावची वाढती लोकसंख्या व बस स्थानकात जवळ शाळा महाविद्यालय पोलीस स्टेशन पोस्ट ऑफिस बँक असून वर्दळ असल्याने या मार्गावर नेहमीच गर्दी असते.

शासनाकडून रेल्वे स्टेशन ते बस स्टॅन्ड पर्यंतचा प्रमुख मार्ग निवेदनामध्ये मध्ये १८ मीटर मंजूर झाला असून गेल्या दोन महिन्यापासून काम सुरू झाले आहे. रेल्वे स्टेशन ते महात्मा गांधी विद्यालय पर्यंतचा 18 मीटर झाला परंतु महात्मा गांधी विद्यालयापासून तिरंगा सर्कल पर्यंत पंधरा मीटरचे काम होत असून अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत आहे. भविष्यात वाढती लोकसंख्येमुळे अडचण निर्माण होणार असून तात्काळ अतिक्रमण काढून मार्ग 18 मीटर व्हावा या मागणीसाठी आम आदमी पार्टी वरणगावने बांधकाम विभाग भुसावळ कार्यालयाकडे तक्रार लिखित दिली असून होणारा मार्ग 18 मीटर व्हावा या मागणीसाठी जिल्हा उपाध्यक्ष भीमराव निकम विजय सुरवाडे आदीसह अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content