चोपडा, प्रतिनिधी | येथील शिंदेवाड्यातील रहिवासी व स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे कर्मचारी मुकेश विठ्ठल शिंदे (वय २९) यांचा काल (दि.३०) तालुक्यातील निमगव्हाण येथे तापी नदी पात्रात बुडून अकस्मात मृत्यू ओढवला आहे.
त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, वहिनी, पुतण्या व पुतणे असा परिवार आहे. तो वृत्तपत्र वितरक जगदीश शिंदे यांचे भाऊ होते. अत्यंत बोलक्या स्वभावामुळे मुकेश सर्वांना परिचित होता. त्याच्या अचानक निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या निधनाबद्दल येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॅा. नाईक करीत आहेत.