धावत्या रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळगाव ते शिरसोलीदरम्यान असणाऱ्या रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ४ जून रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमोल त्र्यंबक सावकारे (वय ३९, मोहन नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा असा परिवार आहे. अनेक महिन्यांपासून तो बेरोजगार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मंगळवारी ४ जुन रोजी पहाटे तो घरातून बाहेर गेला होता. दरम्यान, जळगाव ते शिरसोली रेल्वे लाईनवर खांबा क्र. ४१५/८ ए ते ४१५/१० ए दरम्यान त्याने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी ५ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले.

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी अमोल सावकारे याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील कार्यवाहीकरिता दाखल केला. सदर घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमध्ये अमोलच्या परिवाराला धक्का बसला आहे.

Protected Content