सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मस्कावद येथील जगन्नाथ रावजी इंगळे या भाविकाचा मृत्यू झाला असून त्यांचे पार्थिव गावी रवाना करण्यात आले आहे.
जगन्नाथ रावजी इंगळे हे आपल्या सौभाग्यवतींसह प्रयागराज येथे गेले होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती थोडी बिघडली होती. आज दुपारी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी त्यांच्या मृतदेहावर पुष्पहार अर्पण करून त्यांचे पार्थिव गावाकडे पाठविले आहे. त्यांच्या सोबत पत्नी आणि दिवंगत जगन्नाथ इंगळे यांचे मित्र अरूण फेगडे व महेंद्र इंगळे सोबत निघाले आहेत. तर, प्रयागराज येथे शेखर वानखेडे, शरद कस्तुरे आदींनी मदत केली.