पुणे (प्रतिनिधी) जमावबंदी आदेशाचा भंग करुन पुण्यात बेकायदा रॅली काढल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई आणि त्याच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगणक अभियंता मोहसीन शेख हत्येप्रकरणी देसाई हा अटकेत होता.नुकताच तो जामीनावर बाहेर आला आहे.
सुटका झालेल्या धनंजय देसाईच्या समर्थनार्थ त्याच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे घेऊन पुण्यात रॅली काढली होती. सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात दंगल उसळली होती. या दंगलीत संगणक अभियंता मोहसीन शेख याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह 23 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यानंतर 17 जानेवारी 2019 रोजी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर धनंजय देसाईला जामीन मिळाला होता. धनंजय देसाईची तीन दिवसांपूर्वी येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली. यावेळी धनंजय देसाई याचे शेकडो समर्थकांनी भगवे झेंडे घेऊन शहरात रॅली काढली होती.