अहमदाबाद (वृत्तसंस्था) डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानाचा मसुदा एका ब्राम्हणाने तयार केला असल्याचा दावा गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र तिवारी यांनी केला आहे. ते दुसऱ्या विशाल ब्राम्हण बिझनेस समीटमध्ये बोलत होते.
यावेळी राजेंद्र तिवारी बोलतांना पुढे म्हणाले की, इतिहास साक्ष आहे की, ब्राम्हण कायम दुसऱ्यांना पुढे करत. हे बी एन रावच होते ज्यांनी आंबेडकरांना आपल्यापेक्षा पुढे ठेवले. ‘तुम्हाला माहित आहे का, 60 देशांचे संविधान एकत्र आणून त्याचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर आपल्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. पण जेव्हा पण संविधानाचा विषय निघतो तेव्हा आपण अभिमानाने डॉ. आंबेडकरांच नाव घेतो. तुम्हाला माहित आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हा मसुदा कुणी दिला? संविधानाचा मसुदा हा बी.एन.राव यांनी तयार केला आहे. आम्हाला आंबेडकरांचा अभिमानच आहे कारण 25 नोव्हेंबर 1949 मध्ये त्यांनी संविधान सभेत आपल्या भाषणातून याची कबुली दिली. ते म्हणाले की (आंबेडकरांच्या शब्दात),’जे श्रेय मला देण्यात आले, ते खरं म्हणजे माझे नाही. ते बी एन राव यांचे आहे. एवढंच नव्हे तर अभिजीत बॅनर्जीसह नऊ भारतीय नोबेल पुरस्कार विजेत्यांमध्ये आठ ब्राम्हण असल्याचा देखील दावा तिवारी यांनी केला आहे. या समीटमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील उपस्थित होते.