Home धर्म-समाज भुसावळातील ‘त्या’ उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली (व्हिडीओ)

भुसावळातील ‘त्या’ उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली (व्हिडीओ)


भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिका प्रशासन सेवेत समावून घेत नसल्यामुळे त्रस्त झालेले वाहन चालक अशोक मोटवाणी हे गेल्या तीन दिवसांपासून भुसावळ नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांची प्रकृती ढासाळली आहे.

भुसावळ नगरपालिकेत 25 वर्षापासून काम कारणाऱ्या कायमस्वरूपी असलेल्या वाहन चालकास कोणतेही कारण नसतांना पालिका प्रशासनाने अचानकपणे 2010 मध्ये कामवरून काढल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पिडीत चालकाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. औरंगाबाद उच्च न्यायालयाने चालकाच्या बाजूने निकाल असूनही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने अखेर मोटवाणी हे भुसावळ नगरपालिकेसमोर उपोषणाला बसले आहे.
जर मी चुकीचे करत असेल तर माझ्या विरुध्द कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्ते मोटवाणी यांनी सांगितले.

यावर भुसावळ मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता उच्च न्यायालयाचा असा कुठलीही आदेश नसल्याचे लाईव्ह ट्रेन्डसशी बोलतांना सांगितले. ते म्हणाले की, संबंधीत व्यक्ती खोटी माहिती देऊन दिशाभूल करत आहे. या प्रकरणी आपली चूक असल्यास खुशाल गुन्हा दाखल करावा अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.

पहा : अशोक मोटवाणी यांचा नेमका काय आरोप आहे ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound