चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी गावात एकाचे बंद घर फोडून घरातून ७२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुकुमचंद लीलाचंद पाटील रा. भोकरखेडी ता.चोपडा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान २६ ते २७ फेब्रुवारी दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटातून २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे टंगल, १० हजार रुपये किमतीचे सोन्याची अंगठी, ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे चिपा आणि १२ हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता उघडकीला आली आहे. या संदर्भात दुपारी अडावद पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यासनुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.