आचारसंहिता येत्या 7-8 तारखेला लागण्याची शक्यता : शरद पवार

sharad pawar

नाशिक (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या 7-8 तारखेला लागू शकते, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. ते नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

लोकांना बदल हवा आहे. जे तीन राज्यात झाले ते सर्वत्र होणार आहे. जवानांची हत्या झाल्यानंतर केंद्राची बोलावलेल्या बैठकीत देशावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल तर जवानांवंच्या पाठीशी उभे राहू. निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली तर त्याचाही विचार होऊ शकतो. पण देशावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही,असे सर्व पक्षीय दलाच्या बैठकीत आपण सांगितल्याची माहिती देखील श्री.पवार यांनी दिली. आपण भूमिका घेतली की राजकारण आणायचे नाही. भाजपचे लोक मात्र राजकारण करु लागले. गावोगावी झेंडे घेऊन नाचायला लागले. एकंदरीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या 7-8 तारखेला लागू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे, देखील श्री. पवार म्हणाले.

Add Comment

Protected Content