बारामती (वृत्तसंस्था) ‘एकच वादा अजित दादा, एकच साहेब पवार साहेब’ अशा घोषणा देत बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण थांबविले. यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. यामुळे काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पवार कुटुंबीयांवर टीका केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची चर्चा आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणली असून कार्यकर्त्यांची चौकशी सुरू केली. तर ताब्यात घेतलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जोपर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत नारा देत राहणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीकडून घेण्यात आली आहे. दुसरीकडे शुक्रवारी देखील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकरण्यात आल्याचे समोर आले होते.