मुख्यमंत्र्यांनी साधला जिल्हयातील बहिणींशी संवाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र बहिणींना 14 ऑगस्ट पासून त्यांच्या आधारसंलग्न खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये पडायला सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यातील पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. राज्यातील अशा सर्व बहिणींशी प्रतिनिधीक स्वरूपात दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य व्यवस्था केली होती. यासाठी पात्र भगिनी उपस्थित होत्या. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे होते. जळगावला 13 ऑगस्ट रोजीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला होता.


आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.. अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला. राज्यातील विविध जिल्ह्यातील महिलांनी यावेळी उत्स्फूर्त भावना बोलून दाखविल्या.

जळगाव मधील ज्या महिलांना 3 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला, काही बहिणींना प्रतिनिधीक विचारले असता, सौ सुनिता दिलीप चांदेलकर म्हणाल्या,’मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मला मिळाला, आमच्या मुलाच्या शिक्षणा करता तुम्ही 3000/-रुपये दिल्या बदल मी तुमची आभारी आहे’ तर सौ. वंदना विनोद आवारे म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मला मिळाला. रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्ही ओवाळणी म्हणून ३०००/- रुपये बहिणीला दिले, खुप आनंद वाटला. मोनिका महाजन या आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाल्या, आम्हाला वाटले नव्हते एवढ्या लवकर पैसे मिळतील. पैसे आल्याचा मेसेज बघून आनंद वाटला. सुनिता धनगर या अंगणवाडी मदतनीस आहेत, त्या म्हणाल्या, मला तर खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाच, पण आम्ही ज्या महिलांचे फॉर्म भरून घेतले त्यांचे पैसे जमा झाल्याचे फोन येत आहेत. त्या आनंद व्यक्त करत आहेत.

Protected Content