स्वत: कार चालवत मुख्यमंत्री पंढरपूरला रवाना

मुंबई प्रतिनिधी | आषाढी एकादशीच्या पुजेसाठी आज दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आपल्या पत्नीसह पंढरपूरला निघाले असून ते स्वत: कार चालवत आहेत.

शासकीय पूजेसाठी पंढरपूरला  रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत आहेत त्यांच्या शेजारी पत्नी रश्मी ठाकरे बसल्या आहेत.

मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणार आहेत.  मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब यांच्या मुंबई ते पंढरपूर प्रवासासाठी रस्ते वाहतूक पावसाच्या परीस्थितीचा अंदाज घेऊनच मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रवास निश्चित केला आहे.

आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करतील. केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.

 

Protected Content