चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण व विद्यमान उपनगराध्यक्ष आशाबाई रमेश चव्हाण यांनी आज आपल्या संपूर्ण परिवारासह मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी चव्हाण कुटुंबातील बहिण, भाचे, पुतण्या व मित्रपरिवाराने मतदानाचा हक्क बजावला. चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमाल मापाडी भवन येथील केंद्रात त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे, शिवसेनेचे तालुका संघटक सुनील गायकवाड, शिवसैनिक प्रभाकर उगले, पांडुरंग बोराडे, ज्ञानेश्वर गायके, अतुल चव्हाण, विजय पाटील, सोमनाथ साळुंखे, रमेश भवर, लिलाबाई गायके आदींनी देखील मतदान केले.