नवी दिल्ली प्रतिनिधी । रिक्त जागा भरण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिम अंतर्गत देशभरात शिक्षकांची ८४ हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज ट्विटरवरून दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तरुणांसाठी देशभरात शिक्षकांची पदे भरली जाणार आहे. सोमवारी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. देशभरात साधारणपणे एक लाख पदे भरण्यात येणार आहेत. यात केंद्र सरकारमधील १४ हजार पदांचा तर ८४ हजार राज्य सरकारच्या अखत्यारित पदांचा समावेश आहे. अन्य रिक्त जागांसाठी राज्यांशी चर्चा सुरू असल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे. शिक्षकांच्या १४ हजार पदांच्या भरतीसाठी याआधीच जाहिरात निघाली आहे. तर काही दिवसांत देशभरातील ८४ हजार शिक्षकांच्या पदासाठी जाहिरात निघणार आहे. या जागा देशभरातील विविध भागात भरल्या जाणाऱ्या आहेत.