भुसावळ, प्रतिनिधी । भारतातील संपूर्ण वकील वर्गास इॅकोनाॅमिकल रिलीफ पॅकेज मिळवे अशी मागणी अॅड. अभिजीत मेने यांनी पंतप्रधान मोदी यांना ऑनलाइन निवेदन देवून केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, वकिल हा उपजीविका कमविणेसाठी पूर्ण पणे वकिली व्यवसायावर अवलंबून आहे. कायदे प्रमाणे वकिली सोडून वकीललाला दुसरे कोणतेही उत्पन्नाचा व्यवसाय करता येणे नाही. मार्च २०२० पासून कोरोना महामारीमुळे कोर्ट नियमित कामकाज करू शकत नाही आहे. म्हणून वकील वर्गातील बहुतांश वकिलांवर आर्थिक संकट ओढवले आहे, वकिलांनी नेहमी देशाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. आज सरकारने वकील वर्गाच्या पाठीशी उभे रहाने गरजेचे आहे. तरी सरकारने ह्या विषयाला प्राथमिकता देऊन, एक समिती गठित करून वकिली व्यासायाच्या आर्थिक अडचणीवर अहवाल तयार करून देशातील संपूर्ण वकिलांसाठी आर्थिक रिलिफ पॅकेज घोषित करावे अशी मागणी केली आहे.