केंद्राने शेतकऱ्यांशी संबंधित सात योजनांना दिली मंजूरी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित 7 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळाने सोमवारी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ७ मोठे निर्णय घेतले आहेत.

अश्वनी वैष्णव म्हणाले, पहिले डिजिटल कृषी अभियान आहे, ते म्हणजे शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार करणे. 2817 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिजिटल कृषी मिशन तयार केले जाईल. ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्न आणि पोषण या पीक विज्ञानासाठी समर्पित 3,979 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. तसेच, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाने 2,817 कोटी रुपयांच्या डिजिटल कृषी मिशनला मंजुरी दिली.

याशिवाय कृषी शिक्षण आणि व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी 2,292 कोटी रुपयांच्या तरतुदीसह एका कार्यक्रमाला मंजुरी दिली. तसेच, शाश्वत पशुधन आरोग्यासाठी सरकारने 1,702 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने फलोत्पादनाच्या विकासासाठी 860 कोटी रुपये आणि कृषी विज्ञान केंद्रांसाठी 1,202 कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

Protected Content