नवी मुंबई (वृत्तसंस्था) येथील कामोठे येथे भरधाव वेगात असलेल्या कारने आठ जणांना चिरडले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाले आहेत.
रविवारी संध्याकाळी कामोठ्यातील सेक्टर सहामधील एका गजबजलेल्या रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताची दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. मृतांमध्ये ७ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातानंतर तिथं उपस्थित नागरिकांनी स्कोडाच्या चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. कारमध्ये दारूचा बॉक्स सापडल्याने हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय आहे. अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाले आहे.