Home Cities धरणगाव सर्व्हेतून ठरणार धरणगावातील महायुतीच्या नगरसेवकपदाचा उमेदवार !

सर्व्हेतून ठरणार धरणगावातील महायुतीच्या नगरसेवकपदाचा उमेदवार !

0
320

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नगरपालिका निवडणुकीत धरणगाव येथे भाजप आणि शिवसेनेची युती निश्चीत झाली असून नगरसेवकपदाच्या उमेदवाराची निवड ही ताज्या सर्व्हेतून करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात अनेक नगरपालिकांमध्ये महायुतीत विसंगती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, काही नगरपालिकांमध्ये मात्र शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांचे सूर जुडल्याचे दिसून येत आहे. कालच आमदार मंगेश चव्हाण व आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत पारोळा आणि एरंडोल येथे दोन्ही पक्षांची युती होणार असल्याची घोषणा करण्यात आली. हाच पॅटर्न जळगाव ग्रामीणमध्ये देखील अंमलात येणार आहे. यात धरणगाव येथे महायुतीतून शिवसेनेचा उमेदवार लढणार असून नशिराबाद येथे महायुतीतून भाजपचा उमेदवार लढणार आहे.

दरम्यान, धरणगाव नगरपालिकेतून शिवसेनेच्या उमेदवारासाठी महायुतीच्या वतीने ताजे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. यात इच्छुक उमेदवारांपैकी नेमका कोण निवडून येण्यास सक्षम आहे ? याची चाचपणी करण्यात येणार आहे. यातून ज्याचे नाव आघाडीवर असेल त्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचे महायुतीच्या सूत्रांनी सांगितले आहे. लवकरच याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

यामुळे आता ताज्या सर्व्हेक्षणात कोण बाजी मारत नगराध्यक्षपदाचे तिकिट पटकावणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound