समृध्दी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने बस उलटली

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | समृद्धी महामार्गावर छत्तीसगड राज्यातील खासगी बस भरवेगात उलटली. सुदैवाने यात प्राणहानी झाली नसून प्रवासी जखमी झाले आहे. आज ५ जूनला मेहकर तालुक्यातील डोणगाव नजीक ही दुर्घटना घडली. छत्तीसगड येथून पुण्याकडे जाणारी (सीजी.०९ जे. आर. ७००२ क्रमांकाची) खाजगी बस आज डोणगाव जवळ पोहोचली. दरम्यान, चालकाला डुलकी लागल्याने बस उलटली.

बसमध्ये जवळपास ५६ प्रवासी असल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये दोन प्रवासी जखमी झाले आहे. देवसिंग धुर्वे व राजबब्बर अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठले. परिसरातील रुग्णवाहिकेतून जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर किरकोळ जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले असून त्यांच्या पुढील प्रवासाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. पोलिस घटनेचा तपास करीत आहे.

Protected Content