बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील निवृत्तीनगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की,  अविनाश वसंतराव साळुंखे (वय-५१) रा. निवृत्ती नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शिक्षकाची नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ५ मे रोजी सकाळी ६.३० वाजता घराला कुलूप लावून ते बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. बंद घर असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने आणि १० हजाराची  रोकड असा एकुण ५४ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. अविनाश साळुंखे हे १३ मे रोजी घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. शनिवार १४ मे रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.

 

Protected Content