विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते सोमवार, दि. २९ जुलै, २०२४ रोजी “वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व” या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० ते ५.०० यावेळेत हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील निवड केलेल्या सन्माननीय सदस्यांना “उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असेल.

Protected Content