रावेर प्रतिनिधी । शहरातील मराठा समाजातर्फे (दि.११ मार्च) रोजी वधु-वर परिचय पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमा प्रांतधिकारी कैलास कडलग यावल तहसीलदार महेश पवार बिडिओ दिपाली कोतवाल सिईओ रविंद्र लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशीमबंध पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे आयोजकां कडून सांगितले आहे.
कोरोना पादुर्भाव लक्षात घेऊन सर्व नियमांचे तंतो-तंत पालन करून मराठा समाजा तर्फे गुरुवार दि ११ मार्च रोजी दुपारी १२ वा रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालयात वधु-वर पुस्तक प्रकाशनाचा संभारंभ आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम मराठा समाज वधु-वर परिचय व सामूहिक विवाह समिती तर्फे आयोजित आहे.कोरोना पादुर्भाव लक्षात घेता कार्यक्रमाला ठरावीक निमंत्रण देण्यात आले आहे.