वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळला

images 1

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एस.टी. वर्कशॉपच्या मागील बाजूस ७५ वर्षीय वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने रविवारी सकाळी एकच खळबळ उडाली़ होती. मात्र, काही वेळातच त्या वृध्द व्यक्तीची ओळख पटली. रमेश तुकाराम शिरसाठ (रा.कासमवाडी) असे मयताचे नाव आहे.

 

रमेश शिरसाठ हे सेवानिवृत्त असून कासमवाडीत पत्नी व चार मुलांसह वास्तव्यास होते. शनिवारी ते काही कामानिमित्त घराबाहेर पडले, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे कुटूंबिय त्यांचा शोध घेत होते. अखेर रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एसटी वर्कशॉपच्या मागील बाजूस काही नागरिकांना त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत एमआयडीसी पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच मृतदेहाची ओळख पटली. तो मृतदेह अखेर रमेश शिरसाठ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुटूंबियांना त्याबाबत माहिती कळवण्यात आली. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Add Comment

Protected Content