अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जोशीपेठ येथील स्वामिल जवळ एका अनोळखी अंदाजे ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता समोर आली आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जोशीपेठ भागातील स्वामिलजवळ एका अनोळखी अंदाजे ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता आढळून आला. या संदर्भात बापू कडू पाटील यांनी शनिपेठ पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटवावी अशी आवाहन शनिपेठ पोलिसांनी केले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी करीत आहे.

Protected Content