जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरात संजय पंढरीनाथ पाटील (वय-४५) रा. राजवड ता.पारोळा यांचा आज सकाळी मृतदेह आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील मेहरूण परिसरात आज शनिवारी सकाळी सुरूवातीला अनोळखी म्हणून प्रौढ व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर आणि शुध्दोधन ढवळे यांनी घटना स्थळी धाव घेतली. त्याची खिश्यांची चौकशी केल्याने संजय पंढरीनाथ पाटील असे नाव मयताचे नाव असल्याचे उघडकीला आले. पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. दरम्यान अति मद्यसेवनामुळे संजय पाटील यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला. मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरत होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.