बेपत्ता झालेल्या बामणोद येथील तरूणाचा मृतदेह आढळला

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । फैजपूर शहरापासून बामणोद येथील आठ दिवसापासून बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

कैलास कडू सोनवणे (३६ वर्षे) रा. बामणोद ता. यावल असे मयत तरूणाचे नाव आहे.  सविस्तर माहिती अशी की, कैलास सोनवणे हा तरूण गेल्या आठ दिवसांपासून बामणोद येथून बेपत्ता झाला होता. यासंदर्भात फैजपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंदी करण्यात आली होती. दरम्यान, सोमवार १७ जानेवारी रोजी बामणोद -पाडळसे रोडवर शेतात जाणाऱ्या महिलांना गेल्या ३/४ दिवसांपासून प्रेत दिसले होते. पाटबंधारे विभागाच्या कालव्यात हे शव वाहून आल्याने याबाबतची खात्री करण्याकरिता अनेक नागरिक घटनास्थळी धाव घेतली होती.

याबाबत पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी फैजपूर पो.स्टे. ला माहिती दिली. पाडळसे येथील पांडुरंग श्यामराव कोळी याने कालव्यातील हे शव काढण्यास मदत केली. यानंतर प्रेताची ओळख पटली.

 

मयत सोनवणे बेघर वस्तीतील रहिवासी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, त्याची पत्नी, मुले असा परिवार आहे. कैलास हा शांत स्वभावाचा होता वडिलांचा चहाचा व्यवसाय असल्याने त्यांना मदत करीत असे. महिन्यापूर्वी पत्नीशी घटस्फोट घेतला होता. या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Protected Content