यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह विरावली शिवारातील शेतात मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. गणेश उर्फ सोनू प्रकाश सपकाळे (वय-३०) रा. विठ्ठलवाडी ता. यावल जि.जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
गणेश सपकाळे हा गेल्या तीन दिवसांपासून घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला होता. यावल शहरापासून दोन किलोमिटर वरील लांबि चोपडा मार्गावरील दरबारसिंग पाटील यांच्या विरावली शिवारातील शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत आल्याने हा प्रकार समोर आला. दरम्यान, यावल पोलीसांनी घटनस्थळी धाव घेवून पंचनामा केला. तीन दिवसांपासून बेपत्ता झालेला हाच तरूण असल्याचे ओळखी पटली. पोलीसांनी मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी जागेवरच पंचनामा केला. शेतमालक दरबारसिंग शांताराम पाटील यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस करीत आहे.