नेपाळमधील अपघातातील मृतदेह आज घरी पोहचणार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नेपाळमधील बस अपघातात 27 प्रवाशांचा मृत्यू झाला असून यातील 25 जण भुसावळ तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून या सर्वांचे मृतदेह आज दुपारपर्यंत आणले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

काल सकाळी नेपाळमधील पोखरा व काठमांडूच्या दरम्यान बस मास्यार्गाडी नदी पात्रात पडून झालेल्या अपघातात 27 आबालवृध्दांचा मृत्यू झाला असून यातील बहुतांश भाविक हे भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, तळवेल परिसरातील होत्ो. ही माहिती मिळताच परिसरावर शोककळा पसरली. सकाळीच या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तथापि, रात्री उशीरा नेपाळ शासनाने मृतांची अधिकृत आकडेवारी जारी केली. यानुसार, सदर अपघातात 27 स्त्री-पुरूषांनी प्राण गमावले आहेत. यात ड्रायव्हर व क्लीनर वगळता अन्य सर्व जण हे वरणगाव व तळवेल परिसरातील होते.

दरम्यान, भुसावळचे आमदार संजय सावकारे हे काल दुपारीच आपल्या सहकाऱ्यांसह नेपाळला रवाना झाले असून त्ो आज सकाळी अपघातस्थळी पोहचतील अशी अपेक्षा आहे. सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर सर्वच्या सर्व मृतदेहांना विशेष विमानाद्वारे नाशिक आणि नंतर त्ोथून रोडाने त्यांच्या घरी पोहचवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Protected Content