यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व अध्यात्मिक गुरू युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रावते यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. अध्यक्षीय भाषणात प्रा. ए. पी. पाटील यांनी कणखरपणा, सामाजिक जबाबदारी, संभाषण कौशल्य, अनुभवातून शिकवण, बचत करणे या गुणांचा विद्यार्थ्यांनी अधिकार करावा असे सांगितले. प्रा. निर्मला पवार यांनी स्वामी विवेकानंदांचा जीवनपट सविस्तरपणे मांडला.
कार्यक्रमात उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रा. मनोज पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. एस. पी. कापडे डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. रजनी इंगळे, प्रा.कोष्टी मॅडम प्रा. सी. के. पाटील प्रा. अरुण सोनवणे, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे, प्रमोद कदम यांनी परिश्रम घेतले.