अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे खुर्द गावाजवळ दुचाकी लावून उभा असलेल्या तरुणाला अर्धा वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1.30 वाजता घडली आहे. याप्रकरणी सकाळी 8 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटू दगा चव्हाण राहणार कर्ले ता. सिंदखेडा जि. धुळे असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे भटू चव्हाण हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. दरम्यान शनिवारी 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सोमवार असतो दुचाकी (जीजे 05 सीसी 4714) ने जात असताना अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे खुर्द गावाजवळ रस्त्यावर दुचाकी करून उभा असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी कुऱ्हे खुर्द गावातील पोलीस पाटील राकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन नावावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कमावत करीत आहे.

Protected Content