नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी हॉस्पिटलसमोरून लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातून एका तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ३० मे रोजी दुपारी ३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवार २ जून रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, महमद अखिल शेख पिंजारी वय-३९ रा. सांगवी ता. यावल हा तरुण नातेवाईकांना भेटण्यासाठी ३० मे रोजी दुपारी ३ वाजता त्याची दुचाकी (एमएच १९ एटी ९१६१) ने जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आला होता. त्यावेळी त्याने महाविद्यालयाच्या गेट समोर दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटना लक्षात आल्यानंतर मोहम्मद अखिल शेख पिंजारी याने सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला, परंतु दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अखेर रविवार २ जून रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा पाटील हे करीत आहे

Protected Content